नवे वर्ष नवी मी
नवे वर्ष नवी मी
नवीन वर्ष लागले कि नवा संकल्प बनवायचा हे काही मला नवीन नाही. पण दहा पंधरा दिवसातच त्या संकल्पाची कशी वाट लागते हेही. मला माहित आहे. पण यावर्षी संकल्प काटेकोरपणे पाळण्याचे मी ठरवले. पहिला संकल्प म्हणजे रेग्युलर लिखाण व्हायला पाहिजे. दरवर्षी मी या 52आठवड्याच्या आव्हानात भाग घेते. चार पाच भाग लिहिते आणि मग लिहिणे बंद आता असे होणार नाही याची मी नक्की काळजी घेण्याचा प्रयत्न करेल. रोज काहीतरी लिहिल्याच गेले पाहिजे. जेणे करून माझे लिखाण सुधरेल.
दुसरा संकल्प मी मागच्या वर्षी गीता संथा वर्ग जॉईन केला. त्यात पहिली पाठांतराची तीन अध्ययाची गीता जिज्ञासू परीक्षा उत्तीर्ण केली. आता पुढची पाठक सहा अध्याय पाठांतराची परीक्षा आहे. आणि नंन्तर बारा अध्याय पाठांतर त्
याला गीता पठीत असे म्हणतात. शेवटची अठरा अध्याय पाठांतराची परीक्षा आहे. त्याला गीता व्रती असे म्हणतात. मला या वर्षीच्या शेवटपर्यंत या सर्व परीक्षा उत्तीर्ण करायच्या आहेत.
तिसरा संकल्प या वर्षी मला भरपूर वाचन करायचे आहे. दर महिन्यात एक याप्रमाणे किमान बारा पुस्तकं वाचायची आहेत.मी वाचण्याची सुरवात छत्रपती सम्भाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित छावा या कादंबरीने केली.
चौथा संकल्प जो प्रत्येक व्यक्ती करतो ते म्हणजे आरोग्याची काळजी घेण्याचा कारण "आरोग्यम धनसंपदा " आहे. त्यासाठी नियमित योग, आहार, ट्रेकिंग, वॉकिंग करण्याचा आहे.
हे चार संकल्प या वर्षी केले आहेत. त्या दिशेने शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...