स्वातंत्र्य
स्वातंत्र्य
राधा एक सर्वसाधारण घरातील इंजिनीरिंग झालेली ध्येयवेडी मुलगी असते. आयुष्यात तिचे अस्तित्व निर्माण करण्याचे लहानपणापासून स्वप्न असते. इंजिनीरिंग झाल्यावर ती एका छोट्या कम्पनीत पुण्यात नौकरीला लागते. रोज सकाळी ऑफिसमध्ये जायचे. ऑफिस मधून आल्यावर वाचन करणे, स्वतःला अपग्रेड करण्यासाठी ऑनलाईन कोर्सेस करणे यात तिच्या दिवसाची रात्र कशी होत असे हे तिचे तिलाही कळायचे नाही. तिचे वडीलही सरकारी खात्यात क्लर्क म्हणून नौकरीला असतात. तसेच आई गृहिणी असते. राधा त्यांची एकुलती एक मुलगी असते. त्या दोघांचाही राधाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण पाठिंबा असतो. राधा दिसायलाही देखणी असते. ती कर्तबगार, सालस आणि देखणी असल्यामुळे एक नाशिकचे पॉलिटिशिन च्या एकुलत्या एका मुलाचे स्थळ तिला सांगून येते.
जे स्थळ चालून येते त्या मुलाचे नाव राहुल असते. राहुलचे वडील पॉलिटिशिन असतात. त्यांचे हॉटेल तसेच डेअरी असे बिझनेस असतात.बरीचशी शेतीही असते. राधाच्या वडिलांना हे स्थळ आवडते. राधा तिच्या वडिलांना म्हणते, "बाबा मला गर्भ श्रीमंत मुलाशी लग्न केल्यापेक्षा माझे अस्तित्व जपू देणाऱ्या मुलाशी लग्न करायला आवडेल." त्यावर तिचे वडील म्हणतात, "तु एकदा मुलाला भेटून तर घे. तुला आवडला तरच आपण विचार करू ", राधा राहुलला भेटायला तयार होते. राहुलला ती सांगते मला माझ्या पायावरच उभे राहायचे आहे. लहानपणापासून मी बघितलेले स्वप्न आहे. त्यावर राहुल म्हणतो,"मी तुझ्या ध्येयाच्या आड येणार नाही."पण मी नाशिकला असतो त्यामुळे तुला इथली नौकरी सोडावी लागेल."तिथे माझे बिझनेस ते तु बघू शकते किंवा तुझ्या आवडीचा बिझीनेस आपण सुरु करू शकतो. राधाला हे पटते. ती लग्नाला तयार होते.
राधाचे आणि राहुलचे थाटामाटात लग्न होते. लग्न झाल्यावर राहुलचे भले मोठे घर असते. खुप सारे नौकर चाकर असतात. त्यात राहुलचे आई बाबा आणि राहुल, राधाच राहतात. पण राहुलचे बाबा पॉलिटिशीअन असल्यामुळे सतत येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असते. घरी नौकर चाकर असले तरी सुनेच्या नात्याने आल्या गेल्याचा सत्कार करण्याची जबाबदारी राधावरच असते. राधाला ती काही काही नविन टेकनॉलॉजि शिकण्याची आवड असते तेही करायला वेळ मिळत नाही.राधा कामात गुरफटून जाते. सहा महिन्यात राधा प्रेग्नन्ट राहते. मग मुल झाल्यावर नविन जबाबदारी येते.तिला पहिला मुलगा होतो. त्यामुळे तो पाच वर्षाचा होईपर्यंत ती पूर्णपणे त्यात गुरफटून जाते.
एकदा अशीच वाटेत राधाला तिची कॉलेजची मैत्रीण समीरा दिसते. राधाची शाळा कॉलेज ची मैत्रीण समीरा असते. राधा नेहमीच अभ्यासात तसेच इतर गोष्टीत समीरापेक्षा पुढे असते. समीरा राधा ला हाय करते. राधाला समीराला पाहून खुप आनंद राधा आग्रहाने समीराला घरी नेते. समीरा राधाला सांगते कि मी नाशिकला फिरायला आली. राधा म्हणते अगं एकटीच कशी आली तेव्हा समीरा राधाला सांगते. अगं मी ट्रॅव्हलिंग vlogger आहे. माझे vlogs तु बघितले नाही का? राधा नाही म्हणते तेव्हा समीरा तिला तिचे चॅनेल दाखवते त्यात समीराचे शम्भर मिलियन सबस्क्रॅइबर असतात.. राधाला खुप आश्चर्य वाटते. समीरा सांगते मी इंजिनिरिंग नंन्तर जर्नलिझमचा कोर्स केला.नंतर काही दिवस एका न्युझ पेपर साठी काम केले. पण मी पहिल्या पासून एका कामात रमत नाही हे तुला माहिती आहेच. मग लग्नानंतर मी जॉब सोडला. असेच लग्नानंतर कुठेही फिरायला गेले कि vlog बनवायची. लोकांना ते खुपच आवडले. मग मी एकटे फिरूनही vlog बनवायला लागली. अर्थात या गोष्टीसाठी मला माझा पती मोहित आणि सासू सासरे यांचा पूर्ण पाठिंबा आहे. माझे सासू सासरे मी असे नेहमी फिरस्तीवर असते तेव्हा माझ्या मुलाकडे लक्ष ठेवतात. तसे घरी सर्व कामाला बायका आहेत. पण ते घरी मुलाकडे लक्ष द्यायला सासू सासरे असल्यामुळे मी निश्चिन्त असते.
समीरा म्हणते तु काय करतेस. तुझे घर तर भारीच आहे. राधा म्हणते, "अगं मी लग्नापासून घरीच असते."
घरी माझ्याही सर्व कामाला बायका आहे पण तरीही सासरे पॉलिटिशिअन असल्यामुळे खुप येणाऱ्या जाणाऱ्याची वर्दळ असते. त्यामुळे मी काही करू शकले नाही. पण तुला बघून आता मी नक्कीच काहीतरी करणार. समीरा म्हणते अगं हो ना तु घरी कशी काय आहे. तु तर आमच्या सर्वांपेक्षा जिद्दी आणि करिअर ओरिएंटेड आहे. राधा म्हणते हो ग मलाही कळत नाही. पण तुला खरच मनापासून थँक्स. तुझ्यामुळेच मला माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली.
समीरा गेल्यावर ती राहुलला सांगते राहुल पाच वर्ष झाले मी घर सांभाळले आता बस झाले मला हा सोन्याचा पिंजरा नको. मला माझे स्वातंत्र्य पाहिजे. राहुल तिला सांगतो हो तु कर काहीतरी. मुलाला थोडे मोठे होऊ दे. पण राधा आता जिद्द सोडायला तयार नसते. मला तुझी आता परवानगीची गरज नाही. मी माझे अस्तित्व शोधणार. मला स्वातंत्र्य हवे. शेवटी राहुल तिची जिद्द बघून तयार होतो. तसेच त्याच्या आईबाबालाही समजून सांगतो. राधा आपले अस्तित्व निर्माण करते.