STORYMIRROR

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Romance

5.0  

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Romance

प्रेमाचं बोलण

प्रेमाचं बोलण

1 min
624


ओठांनी - ओठांशी बोलून तर बघ ....


अमृत नाही पाझरले तर सांग मला ....


श्वासांनी - श्वासांना झेलून तर बघ ....


कस्तुरी नाही उधळली तर सांग मला....


डोळ्यांनी - डोळ्यांशी बोलून तर बघ ....


प्रेमात नाही पडलीस तर सांग मला....


मनानेच - मनाला स्पर्श करुन बघ ....


माझ्यात नाही सामावलीस तर सांग मला......



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance