मायेची सावली
मायेची सावली
तुझ्यामुळे मिळतो आयुष्याला अर्थ
तुझ्याशिवाय आई हे जीवनच व्यर्थ
तुझ्यामुळेच आहे या घराला घरपण
तूच जपलेस या नात्यातील आपलेपण
तूच शिकवलेस उंच भरारी मारायला
आकाशात उडतानही मातीशी नाळ जपायला
तूच आहेस माझ्या जगण्याचा आधार
तूच बनलीस माझ्या जीवनाचा शिल्पकार
