STORYMIRROR

Priti Dabade

Inspirational Others Children

3  

Priti Dabade

Inspirational Others Children

कुटुंब

कुटुंब

1 min
254

कुटुंब शब्द

किती छोटा

अर्थ दडला

फार मोठा


ओळख मिळे

आपल्याला कुटुंबात

स्थान मिळे

आगळे जगात


आई, वडील,

भाऊ, बहीण

आजी, आजोबा

नाती छान


लाभतो साऱ्यांना

एकमेकांचा सहवास

नाती जपत

अगदी खास


प्रत्येकाच्या जीवनातील

महत्वाचा हिस्सा

कुटुंब असते

अजब किस्सा


घरातील गोष्टी

घरात ठेवून

राहतात सौख्याने

गुणदोष सांभाळून


कुटुंबात नांदे

प्रेम, जिव्हाळा

वाटे आदरयुक्त

आपुलकीचा लळा


एकमेकांच्या दुःखात

भागीदार बनतात

सुख सारे

वाटून घेतात


यश मिळता

एका व्यक्तीस

अभिमान वाटे

साऱ्या कुटुंबास 


दुःखी असता

व्यक्ती एखादी

अश्रू डोळ्यांत

जणू नदी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational