लाल रंग हा उत्कटतेचा....
लाल रंग हा उत्कटतेचा....
रंग हा ऊर्जेचा, रंग हा शक्तीचा,
रंग हा उत्साह आणि जोशाचा....
रंग हा आवेगाचा,रंग हा उत्कटतेचा,
रंग हा आकांक्षा आणि
प्रेमाचा.....
माणुसकीच दर्शन घडविणाऱ्या
रक्ताचं प्रतीक तू
अन्याया विरुद्ध सळसळणाऱ्या क्रोधाचा अविष्कार तू.....
सामर्थ्य आणि इच्छाशक्ती ची
धगधगती ज्योत तू,
चैतन्य आणि प्रेमाचा
नितळ, निर्मळ झरा तू....
हास्यातून तुझ्या आनंद पसरवणारा
आमच्या सर्वांचा उत्साह तू,
लाल वस्त्र परिधान करुन नटलेलं
मांगल्याचं प्रतीक तू....
प्रेमाची उधळण करणारी
नवचैतन्याची पहाट तू,
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करणारी
देवी सरस्वतीचं रुप तू.....
मंगलतेचा गुलाल उधळीत
येणारी उत्साहवर्धक लाट तू,
इतरांच्या सौख्याचा विचार करणारी
समृद्धीचं द्योतक तू....
सुखाची बरसात करत
उधळुनी प्रेमाचा गुलाल
डोळे भरुन पहावा आज
रंग तू परिधान केलेला लाल लाल....
