जमत नसेल
जमत नसेल
जमत नसेल तर येऊ नको,
पण खोटे बहाणे सांगू नको,
मन हे हळवे असते रानी,
उगाच त्याला छळू नको ||धु||
क्षणा क्षणाला जग हे बदलते
मन ही आपले असेच असते.
आजचं उद्याचं ठरवू नको
अन वचन मला तू देऊ नको ||१||
जर कधी हे प्रेम भंगले,
तडा जाऊनी जरी दुभंगले,
शाप तू माझा घेऊ नको
अन तुही मला गं देऊ नको ||२||
जर तुला कुणाची साथ मिळाली,
प्रेमाची जर वाट मिळाली
वळून मला तू बघू नको,
पण त्याला ही तू ठगू नको ||3||