पाठलाग पैशाचा.....
पाठलाग पैशाचा.....
आजची पिढी बनतीय खरी धनबारी
पैशामागे धावणे जणू त्याची हो लाचारी
कामाबाबत करतो मात्र तो हयगय सारी
पण पगार घ्यायला असतो तो सगळे समोरी
ही आहे व्यथा खरी नाही शिरजोरी
पैशामागे धावून बनताय धनवान सारी
खरंतर कामाच्या मजेची काही बातच न्यारी
पण ही गोष्ट पिढीला सांगावी कशी बरी
खरं म्हणजे आजचा माणूस आहे यलगारी
पैशाशिवाय त्याची किम्मत आहे भिकारी
गरजेपेक्षा जास्त कमवून बनतीय धनवान सारी
पण ही सगळी मोहमाया याला संकट साक्षीदारी
खरंतर प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या इच्छेचा पुढारी
'जास्त आहे अजून पाहिजे' बनवतेय त्याला भिकारी
गाडी घोडा पैसा लत्ता काही दिवसांचे पाऊनचारी
त्याच्या नादात आपण आनंदाला चढवतोय सुळीवरी
खरी संपत्ती म्हणजे संतुष्टी याचा निसर्ग साक्षीदारी
'जेवढ आहे भरपूर आहे' या सूत्रात असती सुख सारी
बाकी सर्व व्यर्थ गोष्टी त्याला बनवा मजेदारी
जास्त मिळवायच्या नादात सुखाची नका करू मारामारी
तुम्ही आहे समजदार स्वतःचे सल्लागारी
जास्त पैसा म्हणजे चिंता हटवतय अनुस्वारी
चिता बनून ती सुखाला पेटवतेय भूभूत्कारी
सल्ला समजून आता स्वतःला वाचवा हो थोडतरी.
