ऋण माऊलीचे
ऋण माऊलीचे
ऋण माऊलीचे । अनंत जन्माचे ।।
भांडार प्रेमाचे । सर्वकाळ ।।१।।
असंख्य असती । वाटा मरणाच्या ।।
जन्माला येण्याचा । मार्ग आई ।।२।।
जीवाची कितीही । होऊ द्या आबाळ ।।
करिते सांभाळ । लेकरांचा ।।३।।
हेच तीर्थस्थान । ईश्वराचे रूप ।।
वात्सल्य स्वरूप । असे आई ।।४।।
नऊ मास पोटी । ओझे वागविते ।।
वेदना सोसते । बाळा साठी ।।५।।
जन्मोजन्मी हीच । मिळावी माऊली ।।
सुखाची साऊली । *पंडिताला* ।।६।।
