प्रेमाचा लळा
प्रेमाचा लळा
पैजनांच्या रुणझुन ने
जीव होई भाबडा
आसुसलेल्या या मनाला
लागला प्रेमाचा लळा
बोलूनही न बोललेले
अंतरी साठवून ठेवलेले
तुज न सांगताच उमजले
गुज प्रीतीचे न कळलेले
स्पर्शाने तुझिया जागला मनी
आठवणींचा सोहळा
असुरलेल्या या मनाला
लागला प्रेमाचा लळा