Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Arun V Deshpande

Romance Tragedy

2  

Arun V Deshpande

Romance Tragedy

वचन हवे तुझ्याकडून

वचन हवे तुझ्याकडून

1 min
6.7K


भेट होणार नाही यापुढे आपली 

परतुनी तू येणार नाही 

परके झालोत कमनशिबी आपण 

काही इलाज आता नाही ..!

वचन हवे तुझ्याकडून 

क्षण सारे ते हळवे हळवे 

विसरणार तू कधीच नाही 

जरी तू परतुनी येणार नाही 

ताटातूट करणे दोन जीवांची 

दुनियेस याची आवड भारी 

तू तिकडे -मी इकडे कायमचे 

अनिवार ओढीची भेट होणार नाही 

सफल व्हावी प्रीती आपली 

 हरेक प्रेमिजीवास वाटे 

असती दुर्दैवी आपल्यासारखे 

नशिबात आपल्या हे ही नाही 

शपथा घेतल्या आपण त्या 

शब्दांना हवेत विरू देऊ नको 

प्रीत ज्योती राहील तेवती 

वचन हवे तुझ्याकडून 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance