अस्तित्वाची लढाई...
अस्तित्वाची लढाई...
... अस्तित्वाची लढाई...
शोधत होते अस्तित्व आरशात
खळकन फुटला आरसा
झाले त्याचे तुकडे व दिसली माझी रुपं
अनेक
कधी मी आई.. कधी मी पत्नी
कुणाची बहिण तर कुणाची लेक
मी एकटी... भुमिका अनेक
जगतात ही पात्र माझ्यात
हरवलयं माझं अस्तित्व
लावलेत मुखवटे
अनेक
सर्वांशी जोडणी केलीय घनिष्ठ
कि मीच मला हो सापडेना
गुरफटून गेली इतकी या नात्यात
की स्वतःशी स्वतःच नातं उमजेना...
लढायची आहे अस्तित्वाची लढाई
जगायचे आहे विनापाश बंधनमुक्त
खळखळून हसायचंय बिना ओझ्याचं
अन् एकाही भूमिकेला छेद न देता
दाखवायच आहे स्वतःचं अस्तित्व...
जोडले सर्व काचेचे तुकडे एकत्र
दिसली माझीच प्रतिमा मला
कधी मी प्रेमळ.. कधी मी शालीन
कधी बंधनात तर कधी अन्यायाचा प्रतिकारास सज्ज दिसली स्त्री मला.