तुझ्या सोबतीने
तुझ्या सोबतीने
घेतले सात फेरे
तुझ्या सोबतीने,
सुखी आहे संसार
झाले जीवनाचे सोने.
तुझ्या सोबतीने
सोन्याचा संसार,
अवतरला जनू
स्वर्गच भू वर.
तुझ्या सोबतीने
आहे खरा सुखात,
अशीच जन्मभर
साथ सुख दुःखात.
आता एकच आहे
बस देवाला मागणे,
जन्मोजन्मी जिणे
तुझ्या सोबतीने.
तुझ्या सोबतीने
लाभले सुख खरे,
तुझ्या सोबतीनेच
मरणही आहे बरे...
