शांत मनाने
शांत मनाने
आस एक
होईल कधी पूरी
नांदते उरी
सदोदित.
विसावेल कधी
चिंब भिजल्या तनाने
शांत मनाने
तुझ्यात.
तुझ्या मिठीतला
क्षण असेल पुरेसा
चिरंतन असा
ठेवा.
घेई समजून
तगमग माझ्या मनात
भाव नयनांत
दाटलेले.
साजना,सख्या
वेगे ये धावून
वाट पाहून
शिणले.