# थॅंक्यु टिचर.
# थॅंक्यु टिचर.
विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते किती अनमोल
शब्दांत मांडता येत नाही याचे मोल!
पडता पडता चालायला शिकवतात आई वडिल
पण आयुष्याच्या परीक्षेत टिकण्याचा
धडा देतात आपले शिक्षक!
जन्मानंतर आईवडील आपले पहिले गुरू
पण लिहण्या वाचण्याचे ज्ञान होते शिक्षकांपासुन सुरू!
आपल्या संपूर्ण आयुष्याला आकार देतात शिक्षक
मनुष्य रुपी देव असतात जणु शिक्षक!
आर्दशांचा पाया बनुन विद्यार्थी घडवतात शिक्षक
शिष्यांचे जिवन साकारतात ते शिक्षक!
नित्य नवी प्रेरणा देतात ते शिक्षक
अक्षर अक्षर गिरवुन आंम्हाला अर्थ सांगतात ते शिक्षक!
कधी ओरडून जिवन जगण्याचा मार्ग दाखवतात ते शिक्षक
ज्ञान सरीता बनुन आपली नाव पार लावतात ते शिक्षक!
जेव्हा भटकतो विद्यार्थी योग्य दिशा देई शिक्षक
रागावून, शिकवुन, परीश्रमाने आदर्श नागरिक घडवितात ते शिक्षक!
चांगल्या वाईटाची देऊन शिदोरी शिक्षक करतात आपल्या आयुष्याची पायाभरणी!
न फिटणारे ऋण हे जरी
ज्ञानाचे अवीरत नाते नतमस्तक आंम्ही कायम आमच्या गुरुंच्या चरणी!!
