STORYMIRROR

Piyush Lad

Inspirational Others

4  

Piyush Lad

Inspirational Others

आपुली मायबोली मराठी..!

आपुली मायबोली मराठी..!

1 min
1.6K

ती शिवबाचा बाणा, ती कुसुमाग्रजांचा कणा

जीव जाईपर्यंत धाडस देणारी ती म्हणते,फक्त लढ म्हणा


ती गोंडस बाळाचा ळ आहे, ती अर्जुनाच्या बाणांचा ण आहे 

ती अन्यायाविरुद्ध लढण्याऱ्या प्रत्येक क्षत्रियाचा क्ष आहे


ती गुढ्यांचा पाडवा आहे, ती संक्रांतीचा गोडवा आहे

ती वर्तमानपत्रातील शब्दकोड्यांचा तोडगा आहे


ती जिजाऊंची हिम्मत आहे, ती अत्रेंची गंमत आहे

ती शब्दांवर ओघळणाऱ्या कवितेची किंमत आहे...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational