STORYMIRROR

प्रतिक्षा कदम

Tragedy

4  

प्रतिक्षा कदम

Tragedy

मज आस ना कुणाची...

मज आस ना कुणाची...

1 min
939

घनगर्द आज माझ्या काळोख अंतरीचा,

मज आस ना कुणाची, मज ध्यास ना कुणाचा ।


राती वरुन गेल्या आसवांत चिंब ओल्या,

स्वप्नीही आज माझ्या क्षण सुखाचा न आला ।

मनी घाव खोल झाले परि वार हा कुणाचा,

मज आस ना कुणाची, मज ध्यास ना कुणाचा ।


डोळ्यांत आज जागा ना आसवांशिवाय कोणा,

या भाबड्या मनाचा कुणी साधला निशाणा ।

तीर उरी रूटलासे, धनु कोठल्या हातांचा?

मज आस ना कुणाची, मज ध्यास ना कुणाचा ।


निःशब्द सूर झाले, स्वर आत गोठलेला,

मनी माझिया आता रे आघात साठलेला ।

मुखी शब्द ना फुटावे, मज धाक हा कुणाचा,

मज आस ना कुणाची, मज ध्यास ना कुणाचा ।


या मोडक्या मनाला उरली न काही आशा,

कुणी सावरावे अशी हि नाही मला अपेक्षा ।

मनी खंत ना कशाची, मज खेद ना कशाचा,

मज आस ना कुणाची, मज ध्यास ना कुणाचा ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy