परित्यक्ता
परित्यक्ता
सार्वजनीक संपदा
परित्यक्ता सदा
गिधाडांची
गत ती विधवेची
भाव धरा फाटकी
चिंधडयांची
नजर वखवखलेली
जीभ लुचलुचलेली
गोचीडांची
सहजसाध्य वस्तू
आल्यांगेल्याची वास्तु
सोंगाड्यांची
न व्यथा कळणारी
न दरी भरणारी
आतडयांची
शीलाची शिवण
संयमाची वीण
संस्काराची
वैशाख वणवा
भर दुपारी हा
चटक्यांचा!