Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shital Yadav

Inspirational Others

0  

Shital Yadav

Inspirational Others

कविता अंतरीच्या

कविता अंतरीच्या

1 min
460



नवसृष्टी निर्माण करण्यास

रुजती बी उदरी धरणीच्या

अव्यक्त विचार मांडण्यास

स्फुरती कविता अंतरीच्या


सैरभैर विस्कटलेली नाती

जीवनवाटा अधांतरीच्या

वेध घेऊनी अबोल मनाचे

प्रगटती कविता अंतरीच्या


कधी साजरे जन्म सोहळे

तर कधी वेदना मरणाच्या

आरंभ ते अंत मधल्या रेषा

रेखाटती कविता अंतरीच्या


आयुष्य व्यथा संघर्षमयी

मर्मज्ञ भावकल्लोळाच्या

भावतरंग उठतात हळूवार

पाझरती कविता अंतरीच्या


जातिवाद, अराजकतेचे ग्रहण

खिंडार पडे एकतेस देशाच्या

अहिंसा लेखणीरुपी शस्त्राने

अवतरती कविता अंतरीच्या


अज्ञानाचा अंधार मिटविण्या

ज्योती चेतवाव्या शिक्षणाच्या

उजळूनी अवघ्या आसमंतास

लखलखती कविता अंतरीच्या


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational