STORYMIRROR

Manisha Awekar

Tragedy

4  

Manisha Awekar

Tragedy

शीर्षक संकटांशी सामना

शीर्षक संकटांशी सामना

1 min
251

घोंघावती संकटांची

मालिकाच लागोपाठ

संकटांना बांध घाला

भंग हो जीवनवाट     (1)


सागराच्या वादळांनी

तांडवचि आरंभिले

खवळूनी सागराने

प्रांत उध्वस्तचि केले   (2)


रोग विषाणूचा आला

महामारी बळावली

स्पर्श फैलावे तयाला

लाखो माणसे गिळली   (3)


श्रेष्ठ निसर्ग नित्यचि

मनू हतबल झाला

शोध लसीचा न लागे

रोज आकडा वाढला    (4)


आता प्रयत्नांची शर्थ

नको व्यर्थ गलबला

हटवूनी कोरोनाला

संकटांना बांध घाला    (5)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy