प्रेम म्हणजे काय असत...?
प्रेम म्हणजे काय असत...?

प्रेम म्हणजे काय असत ?
प्रश्न साधा सोपा
उत्तर ही साधं सोपं
काही नाही यावर श्रद्धा
म्हणजे प्रेम .....!!!
कारण नाहीला
किंमत ही फक्त आणि फक्त
असण्याने येते
असणे म्हणजेच
प्रेम नाही का ?
हो जिथे जिथे
नाही आहे
तिथे तिथे
आहे ठाण मांडून ठाम आहे...!