आनंदवाटा
आनंदवाटा

1 min

11.6K
नभ भरुन आलेले
मनास फुंकर घालताना
आठव सुखद हसली
माझे मलाच पाहताना...
हास्यशिरोमणी वदनी फुलले
ओळख जुनी स्मरताना
घन सुगंधी कवेत
कातरवेळ धुंद होताना
दवबिंदू मोतिया खुलले
रविकिरणांची किणकिण होताना
परसात केवडा मोहक
स्नेहगंध गुलाबी लाजताना
कल्पवृक्ष खुशीत नाचले
चिंब पावसात भिजताना
थेंब थेंब आसुसलेले
तुझी वाट पाहताना
थेंब थेंब आसुसलेले
तुझी वाट पाहताना...