काय तुला बोलावं
काय तुला बोलावं


आठवणीतल्या पावसाला सांगावं
तुझ्या सोबत चिंब भिजत राहावं......!
तुझ्या प्रत्येक हाकेला यावं
तुझ्या गळ्यात येऊन पडावं
तुझ्या नावाचा इतिहास बनावं.....!
तुझ्या चेहऱ्यावरचं हसू चोरावं
तुझ्या मांडीवर डोकं ठेवावं
तुझ्या डोळ्यात पाहाताना
हळूच ओठांना आपलंसं करावं....!
तू भिजत असताना मला असं
वाटतं तुझ्याकडे एकटक पाहावं
तुझा हसरा चेहरा सारखं बघत बसावं
तुझ्या बाहुपाशात तुला बिलगून राहावं.....!
तू सारखं वाटतं सांगावं
तुझ्या स्पर्शानं मोहून जावं
तुझ्या प्रेमाच्या पावसात चिंब
करून सोडावं.....!
सोडून नको तुला जावं
रात्र जास्त झाली चिखलात
कुठं पाऊल टाकावं तुझ्या
घरातनं नको वाटतं पडावं.....!
तुझ्या आठवणीतल्या पावसात
ओलं चिंब होऊन राहावं
तुझाच बनून कायमचा
तुझ्या हृदयात नावं कोरून जावं.....!