प्रेम भावना...
प्रेम भावना...
उत्कट प्रेमाची भावना
अनेक नात्यात दडते
प्रेमाला उपमा नाही रे
जेव्हा हृदयात ते साठते
विचारांशी नाळ जुळते
मनोमन उफाळून येते
प्रेमळ शब्दांतून नकळत
अंतर्मनाचा कानोसा घेते
स्नेह बंध घट्ट होताना
खोल आठवणीत गुंतते
प्रीत आगळे खेळ करत
एकमेकांत रे अडकवते
आयुष्यभर एकांतवेळी
पुरणारे क्षण मनी वेचते
सहवासाच्या सुगंधात
जवळी ते येतच राहते
मिठीतही रोमांचक उब
अपार माया देऊन जाते
हळवे, व्याकुळ प्रेम मन
विना उपमा हर्षात न्हाते

