स्वप्नी माझ्या...
स्वप्नी माझ्या...


स्वप्नी माझ्या प्रेमात तुझ्या
दूर दूर मी उगाच गेलो
प्रियकर आज तुझाच झालो
मिठीत तुझ्याच सहजी शिरलो
तू फुलराणी मी फूल झालो
तुझ्या रंगात मीच रंगलो
हृदयात तुझ्या शिरतच गेलो
प्रेमात तुझ्या जखमी झालो
रक्तबंबाळ देही झालो
प्रेमवेडा दिसू लागलो
स्वप्नातूनच जागा झालो
पाहता तिला मनीच हसलो
समोरच्या ती खिडकीत उभी
टाटा सहजच करून गेलो
ती ही हसली मी ही हसलो
स्वप्नच होते भुलून गेलो