मी आणि तू
मी आणि तू

1 min

12K
आभाळ मी व्हावे, वारा तू...
ढग मी व्हावे, पाऊस तू...
थेंब मी व्हावे, ओलावा तू...
नदी मी व्हावे, प्रवाह तू...
माती मी व्हावे, गंध तू...
बीज मी व्हावे, अंकुर तू...
झाड मी व्हावे, फांदी तू...
फूल मी व्हावे, सुवास तू...
चिंब मी व्हावे, भिजावे तू...
मन मी व्हावे, भावना तू...
मिठी मी, मिठीत तू...
तुझ्यात मी, माझ्यात तू...