असे पाहायला नको होते!
असे पाहायला नको होते!


तुझ्या मनाने माझ्या मनावर,
प्रेमाचे जाळे टाकायला नको होते
तुझ्या मनाने माझ्या मनाला,
अशी भुरळ घालायला नको होते
त्यात माझ्या मनानेही असे,
नकळत अडकायला नको होते
तू माझ्याकडे असे पाहायला नको होते!
तुझ्या डोळ्यानी माझ्या डोळ्यांशी
असे बोलायला नको होते
त्यात अशा प्रेमाच्या गोष्टी,
करायला नको होते
त्या प्रेमाच्या गोष्टींमध्ये,
मीही असे हरवायला नको होते
तू माझ्याकडे असे पाहायला नको होते!
प्रिये तू ही असे जवळ माझ्या,
यायला नको होते
जवळ येऊन तुही माझ्याशी
प्रेमाच्या गोष्टी करायला नको होते
त्या प्रेमाच्या गोष्टीने,
तू मला आणि माझ्या मनाला,
आपलेसे करायला नको होते
तू माझ्याकडे असे पाहायला नको होते!
अशा या प्रेमाच्या वाटेवर,
तू मध्येच साथ सोडायला नको होते,
प्रेमाच्या या वाटेवर,
विरहाचे दुःख द्यायला नको होते
तू माझ्याकडे असे पाहायला नको होते!