प्रेमाचे भावगीत...
प्रेमाचे भावगीत...
1 min
12.1K
सोबत दुःखात
आभास सुखात
विश्वास नात्यात
आदर प्रेमात...
दोघांचेही हाल
नेहमी समान
असे साक्षीदार
जिव्हाळ्याचे दान...
कुटुंब कबिला
सदैव साथीला
प्रीतीला आपल्या
आशिष लाभला...
प्रेमळ ओंजळ
तुझी माझी प्रीत
अनोखी कहाणी
जणू भावगीत...
आपल्या प्रेमाचे
गुपित रहस्य
देत राहो सदा
गोड स्मित हास्य...