Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Shobha Wagle

Romance Inspirational

3  

Shobha Wagle

Romance Inspirational

पाऊस

पाऊस

1 min
11.7K


लाही लाही झाले उन्हानं

वाट पाहे वसुधा जलधारांची,

नयन हे प्रतीक्षेत नभांगणी 

नील अंबरातूनी बरसण्या पावसाची


"पहिला पाऊस" येई कधी रिप रिप

तर कधी होई ढगांचा मोठा गडगडाट,

व कडाडून होई विजांचा चकचकाट

त्यात वाऱ्याची ही लागे शर्यत सुसाट


मोठमोठाले थेंब पावसाचे अंगावरी

अंग अंग रोमांचित होई शहाऱ्याने

मंद, धुंद, सुगंध त्या ओल्या मातीचा

अवनी ही रोमांचित झाली पावसाने


काळ, वेळ, वय नाही कसले भान

मनसोक्त सारे नाचू बागडू बेधुंद होऊ,

या "पहिल्या पावसाच्या" सृष्टीत न्हाऊनं

आपणही लहान होऊनी मजा घेऊ


विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट

वादळ वाऱ्याची वाटते भीती मनात,

कधी कोलमडूनी पडेल झाड वा वीज

तरी बेधुंद जलधारा घेतो पावसाच्या आनंदात


"पहिला पाऊस" येताच तारांबळ उडे साऱ्यांची

भिजायचं सोडूनी धावती छप्पर वा आडोशाला,

खळखळ पाणी वाहू लागले खाच खळग्यातूनी

मुलांच्या कागदी होड्याही धावे त्या प्रवाहाला


हर्ष "पहिल्या पावसाचा" ज्यांनी अनुभवला

त्यांनाच त्या पावसाचा परमानंद लाभला,

"पहिलाच पाऊस" मुंबईत पडला सायंकाळी

आजारी होते तरी त्याचा आनंद उपभोगला


Rate this content
Log in