स्वप्नवेडे पहिले प्रेम...
स्वप्नवेडे पहिले प्रेम...
भावनांच्या अबोल शब्दांचे
सुंदर काव्य गुंफण असते...
मनाला निरंतर सुखावणारे
ते पहिले प्रेम खास असते...
हृदयातील स्पंदनांना स्पर्शून
मन जपणारे नाते असते...
हरवलेल्या प्रीत बंधनातले
ते पहिले प्रेम नाजूक असते...
अव्यक्त संवादातला दुरावा
अश्रुधारांची प्रेमळ सावली असते.
..
प्रत्येक श्वासातल्या सहवासाचे
ते पहिले प्रेम अस्तित्व असते...
एकदा भेटण्यातली आतुरता
जन्मोजन्मीची प्रतीक्षा असते...
व्याकुळ झालेल्या जीवाचे बोल
ते पहिले प्रेम उतावीळ असते...
नकळत मनात घर करणारे
विश्वासाचे एक गुपित असते...
अलगद कुशीत स्वप्न रंगवणारे
ते पहिले प्रेम वेडे, खुळे असते...