गुलाबाचा काटा
गुलाबाचा काटा

1 min

12.3K
तुझ्या माझ्या प्रीतीचा
इथे प्रकाश पाडू नको
कोमल कळी होती आधी
गुलाबाचा काटा बनवू नको
भांडणाच्या टोकावर
इथे डुलक्या मारू नको
कोमल कळी होती आधी
गुलाबाचा काटा बनवू नको...
त्या खोट्या भावनांचा
इथे पाऊस पाडू नको
कोमल कळी होती आधी
गुलाबाचा काटा बनवू नको...
फसव्या बोलण्याचे
इथे धडे शिकवू नको
कोमल कळी होती आधी
गुलाबाचा काटा बनवू नको...
हे नेहमीचे तुझे नखरे
इथे पुन्हा फसवू नको
कोमल कळी होती आधी
गुलाबाचा काटा बनवू नको...