गुरु पाठी राखा
गुरु पाठी राखा
येताची जुळूनी ।
गुरू कृपा योग ।।
तो असे सुयोग
जीवनात ।। १
गुरू कृपा योगे ।
तरले तरले ।।
आता उद्धरले ।
जीवनात ।। २
कृपेचा तो योग ।
येताची जुळूनी ।।
कृपा ती पाहूनी ।
मोद वाटे ।। ३
लाभताची गुरू ।
ज्ञान संपादन ।।
दुःख निवारण ।
होत गेले ।। ४
गुरूच्या कृपेने ।
मार्ग तो सुलभ ।।
शंकेचे मळभ ।
नसे मनी ।। ५
सद्गुरूविना ।
नसेची उद्धार ।।
ज्ञानाचा सागर ।
असे गुरू ।। ६
करा कृपा आता ।
आम्हांसी रक्षावे।।
दुःख ते हरावे !।
दुरितांचे ।। ७
सद्गुरू कृपे ।
आनंदी जीवन ।।
तृप्त माझे मन ।
सांगे वैशू ।। ८
