STORYMIRROR

Vijay Kadu

Inspirational

3  

Vijay Kadu

Inspirational

बंधन

बंधन

1 min
295

डोक्यावरचा पदर सारुन

तोडलीत ती सारी बंधन

गवसणी घातली आकाशाला

दाखवून दिलं ते जगाला

ओलांडला उंबरठा

तरी मर्यादा सोडली नाही 

जरी तोडली परंंपरा 

तरी संस्कृती विसरली नाही 

चुल न मुुल सांभाळन 

आम्हालाही मान्य आहे

आता देशाची बारी

जगाला ही सांभाळू

आम्हि आजच्या नारि

पाताळ असो कि अंतराळ

मक्तेदारी मान्य नाही

साथ प्रेमाची हवी

भिक नको आम्हाला

हक्क आमचा द्या

स्त्री स्वतंत्र तेे काय

जरा  प्रत्यक्षात येऊ द्या

मागे नाहि आम्हि

पुढे हि जाण्याची इच्छा नााही

खांद्याला खांधा लावायचा

त्यात हि मनी इर्षा नाही 

राजकारण असो की क्रीडा

व्यापार असो वा शास्त्र

नाही राहणार मागे

असो कोणतेही क्षेत्र


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational