क्षण
क्षण
निसटून जातात क्षण हातून
जगायचं सारं राहून जातं
डोळ्यातच राहतात स्वप्ने सारी
खर करायचं राहून जातं
माझं माझं करता करता
सारच सुटून मागे राहत
यश, प्रतिष्ठा, पैश्यापायी
आपल्यांनाच आपण मुकून जातो
निसटून जाण्यापूर्वी सारं
आनंदाने जगून घ्यावं
मृत्यू कधीही उभा ठाकेल
क्षणाचं महत्व जाणून घ्यावं..!
