STORYMIRROR

Manisha Wandhare

Romance

3  

Manisha Wandhare

Romance

निर्णय...

निर्णय...

1 min
133

माझा निर्णय हा झाला ,

तुझ्याशिवाय जगण्याला ,

जगणे ना म्हणावे समजावले मनाला ...

तुझ्या पाऊलवाटांना समांतर ,

माझ्या पाऊलवाटा चालल्या ,

हीच दिशा माझी कळवले मनाला ...

नको दुरावा कधी आपल्यात ,

सांगते अखेरचे मी ,

सोडून दिले सर्वांना सांगितले मनाला ...

ओळखून घेईल मी सारे ,

जागृत असेल इंद्रियांची सतारे ,

प्रेम प्रेमास देईल बजावले मनाला ...

निर्णय अखेरचा हा ,

सप्तपदी जन्म जन्म चालला ,

वचनाने बांधले मी मना जाग वचनाला ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance