मला सांग ना आई...
मला सांग ना आई...
मला सांग ना आई....
का निघून जाण्याची केली घाई
मी तर झालो गाईविना वासरू,
खूप धडपडलं तुझं केविलवाणं काेकरू
तुझ्याविना आयुष्य झालं निरस,
कसा तुझ्या बालकाचा लागतोय कस
मला सांग ना आई....
तुझ्याविना जगण्यात मजाच नाही
तू माझा आरसा,कशी दावू प्रतिमा,
तुझ्याविना कसा जमवू मी लवाजमा
तुझ्या वाटेकडे डोळे लावून मी बसलो,
तू परत येशील या आशेवर जगलो....
