आई
आई
काळ्या मातीचा सुगंध
आईच्या मायेचा गंध
थेट हृदयात माझ्या
तुझ्या पोटी माझा जन्म
भाग्यवान मी आजन्म
झाले जीवनाचे सार्थक
तु राबत असे अखंड
पडलाच नाही खंड
मी करतो आचरण
तुझे मोलाचे संस्कार
झाले जीवनाचे आचार
मी तुझा विचार
तुझे शब्द, तुझे बोल
स्मरण त्याचे खोल
जीवनाचे कळले मोल
मायेच्या ओलाव्यात तुझ्या
मी होतो चिंबचिंब
मी तुझेच प्रतिबिंब
नाहीस आज जवळ
तुझेच सारे बळ
आयुष्य माझे चळवळ
