उत्सव नऊ दिवसांचा
उत्सव नऊ दिवसांचा
उत्सव असा नऊ दिवसांचा
जोश बघा हा रास दांडियाचा
मग्न होती कसे लहान थोर,
आनंदात डुंबती अशी ही पोर
नवरात्र म्हणती या उत्सवाला,
पारावर नाही उरत आनंदाला
नऊ दिवसांचे रंगही असती नऊ,
सोबतीला भोंडल्याची गाणी लागती गाऊ
उपवास मोठ्यांचे चंगळ लहानांची,
चव चाखावी निरनिराळ्या पदार्थांची
आईची खिचडी अन आजीची भगर,
दादाची मात्र राजगिऱ्याच्या लाडूवर नजर
नवरात्रात दर्शन घडे हे साऱ्याच देवींचे,
अन कानी गजर पडे त्यांच्याच नावांचे
जय भवानी माता जय अंबाबाई
जय वनी अन जय रेणूका आई
असतं निमित्त भोंडल्याचं,
वेड यांना नेहमी नटायचं.
द्यायचा उजाळा जुन्या आठवणींना,
निमंत्रण पाठवायचं साऱ्या मैत्रीणीना
नाव घ्यायचं फक्त खिरापतीचं,
अन आपल्याच आवडीचं मागवायचं
स्पर्धा चाले नेहमीच फॅशनची,
पण भारतीय नारीला आवड साडीची
