शिवबा गीत
शिवबा गीत
टगबग टगबग शिवबाचा घोडा
दौडत जाई शिवबाचा घोडा
शिवबा नगरी जावू या
तिथली गंमत पाहू या पाहूया ,तिथली गंमत पाहू या॥
माय जिजाऊ शिवबाची
वडील लाभले शहाजी
स्वराज्य स्वप्ने दोघांची
स्वप्ने अशीही पाहू या , शिवबा नगरी जावू या ॥
भवानी देवी प्रसन्न झाली ,
शिवबाला तिने तलवार दिली
तलवारीने क्रांती केली
शिबबाची क्रांती पाहू या शिवबा नगरी जावू या ॥
बेत केला लढण्याचा,
जमाव केला मावळ्यांचा
जिंकला किल्ला तोरण्याचा
असे हे किल्ले पाहू या , शिवबा नगरी जावू या ॥
आदिलशहास वचक बसवती
खानाची बोटे तोडली
आग्राहुन सुटका केली
असे पराक्रम ऐकू या , शिवबा नगरी जावू या ॥
स्वामिभक्त तानाजी, बाजी
फिरंगोजी आणि नेताजी
आहुती दिली त्यानी प्राणांची
असे स्वराज्य टिकवूया शिवबा नगरी जावू या ॥
जावू या शिवबा नगरी जावू या ॥