आईचं वेडं प्रेम
आईचं वेडं प्रेम
झिजवूनिया रे तिची तिने काया
देण्यास लेकरा थंडी छाया
त्या वेड्या आईच्या प्रेमाची वेडी माया !! धृ!!
कष्ट करण्यास फिरे त्या काट्याच्या वनात
देण्यास सुख लेेकरांच्या मनात
जाई लेेकरासाठी सुख वेेचाया
ठेवूनीया तिच्या मनात अनेक दुुुःख
देई तरीही घर भरून रे सुख
करी प्रयत्न नाही जाओ
तिच्या लेकरांचा जन्म दुःखाने वाया
