STORYMIRROR

Urmi Hemashree Gharat

Romance

3  

Urmi Hemashree Gharat

Romance

पहिलं प्रेम..

पहिलं प्रेम..

1 min
780


प्रेम म्हणजे

तू समोर दिसताच

माझं माझ्यात हरवणं


प्रेम म्हणजे

तुझं लोभस बोलणं

मी तासनतास ऐकणं


प्रेम म्हणजे

तू जवळ नसताना

माझं उगीचंच बेचैन होणं


प्रेम म्हणजे

तुला जिंकताना पाहुन

मला सॉलिड वाटणं


प्रेम म्हणजे

तुझा विषय निघताच

माझं भरभरुन बोलणं


प्रेम म्हणजे

तुझ्या सोबत हिंडताना

वेळेचं पटकन संपणं


प्रेम म्हणजे

तुझ्यासह आयुष्यभराची

गुलाबी स्वप्न रंगवणं


प्रेम म्हणजे

तुझ्या नावाचं सौभाग्य

मी आयुष्यभर मिरवणं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance