शब्दब्रम्ह तूंचि गणेषु '
शब्दब्रम्ह तूंचि गणेषु '
श्री गणपती एकदंत विघ्नहरा रे
महिमा तव सर्व जगी तू चतूरा रे
ती मंगल पाशाअंकुश शोभती रे ॥
सकल मनी प्रकाशू शरण तुला रे
रोज तुला स्मरती सकल जन रे
जननायक तू लंबोदरा रे ॥
सुखकर्ता बुद्धीदाता नित्य तू रे
रेखीव , मोहक रूप तूझे रे
शमीपत्र , मोदक अति प्रिय रे ॥
गाजत वाजत येशी घरा रे
जपाकुसुम रक्तम्बरगंध रे
रेशमी वस्त्र पितांबरा रे ।।
(पुगी फलतंबूल , पंचामृत
चंदन , कुमकुम , सिन्दुर , अक्षत
सिन्दुर तुज हरिद्र गणेश समर्पयामी ।
हाकेला धाव रे , नवसाला पाव रे ।
माझ्या तू भालचंद्रा रे ॥ )