लग्न
लग्न
प्रेम म्हणजे... दोन जीवांचं मिलन
प्रेम म्हणजे... दोन मनांचंं मिलन,
आणि
लग्न म्हणजे... जीव आणि मन
या दोघांनाही जोडणारं अतूट बंंधन...
लग्न म्हणजे... प्रेम, आपुलकी, माया
लग्न म्हणजे... तप्त उन्हात लाभावी
अशी उंच कल्पवृक्षाची छाया
लग्न म्हणजे... आस,
लग्न म्हणजे...सहवास,
लग्न म्हणजे...दोन जीवांनी - दोन मनांनी
एकत्र मिळून चालवण्याचा रथ...
लग्न म्हणजे... एकमेकांची
एकमेकांना लाभलेेेली साथ...
लग्न म्हणजे... एकमेकांची सोबत
आणि
एकमेकांचं आयुष्य सावरण्यासाठी
आयुष्यभर हातात घेेतलेेेला हात...

