STORYMIRROR

Rohit Khamkar

Romance Classics Inspirational

3  

Rohit Khamkar

Romance Classics Inspirational

हेतू

हेतू

1 min
970

घाई झली लिहिण्याची, शब्दांचा बसेना मेळ

काय करावे अनं काय नाही, हाच सारा खेळ


कधी सुचतं कधी नाही, पण काही तरी विचार कायम चालू

आटापिटा प्रयत्नांचा लाऊन, माळ शब्दांची घालू


शब्द म्हने कधी कधी रूसतात, तेही आपल्यावरी

आठवलं तेंव्हाच मांडलं नाही, वेळ सारा गेल्यावरी


मात्र स्वप्न अजून रंगते, विचारांच्या दुनियेत

कवीला फक्त एकांत मिळतो, शब्दांच्या मायेत


जे दिसतं जाणवतं अनुभवतो, किंवा असेल कल्पना काही

लेखक फक्त मांडत असतो, त्यात फसवा हेतू नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance