हे मना जरा पहुड...
हे मना जरा पहुड...
किती विचार करतोस,
दिवसरात्र अन् सदोदित...;
हे मना जरा पहुड...!
चांगले विचार,वाईट विचार,
सारखे सारखे, चर्वितचर्वण.
काय कमविणे? काय गमविले?
काय करावे ,मी ऐसे पण?
कळे ना मजला काय हवे??
दवबिंदूंच्या अस्तित्वासम
विचार भाबडे ओथंबले अन
अर्ध्यांमूर्ध्या आशा लाघव....
आयुष्याच्या भागीदारीत
कोण जिंकला ? कोण हरला?
कोण कुढला?कोण बहरला?
ज्याचे त्याला च, ते ही कळेना...!
किती माणसे चित्र विचित्र;
किती विकृत किती भंपक?
कोणता मुखवटा धारण आहे ?
कोणता आणि गुप्त आहे...?
कशाला करतोस एवढे विचार?
दिवसरात्र अन सदोदित,
हे मन जरा पहुड...हे मना जरा पहुड...!!!
