STORYMIRROR

Kanchan Thorat

Inspirational Others

4  

Kanchan Thorat

Inspirational Others

सावधान

सावधान

1 min
339

एक' बाई 'म्हणून ,

माझ्याशी बोलताना ;

अगदीच नजर चुकवायची ,

गरज नाही....

-की नाही गरज ,

नजर चोरण्याची.

फक्त ,एक 'माणूस' म्हणून माझ्याशी बोल ...!

बघ ,तुला ही ...

काही अवघड नाही;

न मलाही काही अवघड.

आपल्याच बहिणीशी बोलताना,

जे जे चुकीचं वाटेल,

ते सारे बाजूला ठेवून बोल....

बिनधास्त बोल...!

कर चर्चा,

कोणत्याही विषयावर मग ...,

बिनदिक्कत!

शेवटी माणूसच ,माणसाच्या ,

कामी येणार आहे...!

तू कितीही चोरलीस नजर

वा आणलास आव,

साळसूदपणाचा;

पण ---

मी 'बाई' आहे रे ;

लगेच पकडते तुझ्यातला 'चोर'...!

तेव्हा सावधान...;

आपण एका बाईच्या,

नजरेच्या कक्षेत आहात ....

तिच्याशी फक्त 'माणूस'

म्हणून बोला...!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational