STORYMIRROR

Anu Dessai

Fantasy Others

3  

Anu Dessai

Fantasy Others

प्रवास आपला सोबतीने...

प्रवास आपला सोबतीने...

1 min
251

कानी गूज तू सांगता

हुरळून मीच गेलो

बीज होते तुझ्या पोटी

स्वप्नी मी ही बुडालेलो


उलट्यांनी हैराण तू

रात्रभर मी जागलो

तुला लागले डोहाळे

पुरवण्या मी फिरलो


मोठी यादी औषधांची

पाळण्यात मी गुंतलो

हात तुझा रात्रभर

हाती घेऊन बसलो


कळा सोसल्यास किती

तुझ्या वेदना मी ल्यालो

आली बातमी आतून

की मी नवा बाबा झालो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy