गुरुमहिमा
गुरुमहिमा
काय वर्णावा गुरु महिमा
आहे अगाध व अनंत
गुरुच्या आशिर्वादाने होती
या जगी अनेक महंत
करती अविरत सेवा जगाची
करत असतांना ज्ञानदान
यासारखे पवित्र नाही
कोणतेही दुसरे दान
प्रत्येक जण मोठा व्हावा
हिच मनी कायम आस
शिकवितांना उपयुक्त धडे
मनी असतो हर्ष अन उल्हास
कपट नसते मनात कधीही
पाण्यासारखे नितळ जीवन
पैसा कमविण्यापेक्षा मिळते
प्रतिष्ठा टिकणारी आजीवन
सरळमार्गी जीवन जगतांना
येती अडथळे अनेक
शांत व संयमी राहून
मार्ग काढती क्षणी प्रत्येक
गुरुचे उपकार अनंत
फेडूच शकत नाही
गुरुचा महिमा शब्दात
वर्णन करूच शकत नाही
