STORYMIRROR

Kanchan Thorat

Abstract

3  

Kanchan Thorat

Abstract

थोडं हळू हाताळा...

थोडं हळू हाताळा...

1 min
259

जळतंय आत,

 काहीतरी...

 खूप खूपतंय आत,

 काहीतरी...

 सलतंय आत,

काहीतरी...

 मला नाही माहीत,

 हे जळतंय ते काय आहे..?

 हे खूपतंय ते काय आहे...?

 हे सलतंय ते काय आहे..?

 पण आता दुखतंय...

 खूप दुखतंय......

 एवढ की ,गेलंय ते,

 सहन करण्यापलीकडे

 ही ...अशांती आहे ;

 ही ...अतृप्त आहे ;

 ही... आस आहे !

 माझ्या जळलेल्या खूपलेल्या 

सललेल्या,

 जखमेवरची खपली आहे...;

होय....

 थोडं हळू हाताळा,

 तिला...

 कारण ती ,

माझी कविता आहे !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract