आई
आई
मायेची ऊब तुझी जगवते मला खरी
दूर असती दुवे ते नात्याचे पैल तिरी
सांजवेळी दिवावात ,जागती आठवणी ही
ओझरती पापण्याआडची ती सय मायेची
वाहतो मायेचा हा झरा न आटो कधी ही
तुझ्या मायेचा स्पर्श हळवा राहो सदैव मजवरी
पुन्हा तुझ्याच उदरी येईन जन्मा आई मी
करशील ना देवा येव्हढी इच्छा माझी पुरी..

